ई-रिक्षा विधेयकाला लोकसभेत मिळाली मंजुरी

बहुचर्चित असलेलं ई-रिक्षा विधेयक अखेर बुधवारी लोकसभेच्या सभागृहात एकमतानं मंजुर करण्यात आलं. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांकडून या विधेयकावर चर्चा करण्यात आल्यानंतर हे विधेयक मंजुर करण्यात आलं. 

IANS | Updated: Dec 18, 2014, 06:21 PM IST
ई-रिक्षा विधेयकाला लोकसभेत मिळाली मंजुरी title=

नवी दिल्ली: बहुचर्चित असलेलं ई-रिक्षा विधेयक अखेर बुधवारी लोकसभेच्या सभागृहात एकमतानं मंजुर करण्यात आलं. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांकडून या विधेयकावर चर्चा करण्यात आल्यानंतर हे विधेयक मंजुर करण्यात आलं. 

ई-रिक्षा विधेयक मंजुर करण्यात आल्यानं देशातील कोट्यवधी बेरोजगारांना, गरीब कुटूंबातील व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार असल्याचं केंद्रीय सडक परीवहन मंत्री नितिन गडकरी यांनी सभागृहात सांगितलं. 

ई-रिक्षा विधेयकावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, ई-रिक्षामुळं गरीब, दलित, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार असून ई-रिक्षासाठी कोणत्याही लायसन्सची गरज नाही, ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी बँकेत कर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात येईल, याची किंमतही कमी असून सायकल रिक्षा चालवणारे ई-रिक्षा चालवतील, २५ कि.मी.पर्यंत या रिक्षा धावू शकतील तसंच सध्या देशातील प्रमुख महानगरामधील उपनगरामध्ये या रिक्षा चालविण्याची मान्यता देण्यात येणार आहे.

तसंच ई-रिक्षा सुरक्षित नसल्याचा विरोधांकडून करण्यात आलेला आरोप चुकीचा असून ई-रिक्षा पूर्णपणे सुरक्षित असल्याचं गडकरी यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.