वायरल झालेल्या फेसबुक पोस्टपेक्षा बिहारचे मंत्री 'उच्च शिक्षित'!

काही दिवसांपासून 'व्हॉटसअप' आणि सोशल मीडियावर बिहारच्या नव्या मंत्रीमंडाळाबद्दल एक पोस्ट वायरल होताना दिसतेय. या पोस्टमध्ये नव्या मंत्री किती शिकलेले आहेत याबद्दल उल्लेख आहे. पण, ही पोस्ट चुकीची असल्याचं स्पष्ट झालंय. 

Updated: Nov 28, 2015, 03:15 PM IST
वायरल झालेल्या फेसबुक पोस्टपेक्षा बिहारचे मंत्री 'उच्च शिक्षित'! title=

पाटणा : काही दिवसांपासून 'व्हॉटसअप' आणि सोशल मीडियावर बिहारच्या नव्या मंत्रीमंडाळाबद्दल एक पोस्ट वायरल होताना दिसतेय. या पोस्टमध्ये नव्या मंत्री किती शिकलेले आहेत याबद्दल उल्लेख आहे. पण, ही पोस्ट चुकीची असल्याचं स्पष्ट झालंय. 

बिहार इलेक्शन वॉच (BEW) आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) यांनी दिलेल्या माहितीवरून वायरल झालेली माहिती चुकीचं असल्याचं स्पष्ट होतंय. या पोस्टमध्ये बिहारच्या मंत्र्यांमध्ये बहुतेक मंत्री हे कमी शिकल्याचं किंवा निराक्षर असल्याचं म्हटलं होतं. 

अधिक वाचा - यूपी, बिहारी परदेशात झाडू मारतात : राज्यपाल नाईक

बिहारच्या मंत्र्यांनी आपल्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्जात दिलेल्या माहितीनुसार, २८ मंत्र्यांपैकी १७ मंत्री पदवीधारक, चार जण पोस्ट ग्रॅज्युएटस्, तीन जण डॉक्टरेस् मिळवणारे तर पाच जण प्रोफेशनल ग्रॅज्युएटस असल्याचं उघड झालंय. 

अधिक वाचा - नितीश कुमार मुख्यमंत्री होताच, बोट कापले

वायरल पोस्टमध्ये शिवचंद्र राम हे अशिक्षित असल्याचं म्हटलंय परंतु ते पदवीधर आहेत.

अधिक वाचा - VIDEO : लालूंच्या नववी पास मुलाला नीट मंत्रिपदाची शपथही घेता आली नाही!

शैलेश कुमार हे दुसरी आणि विजय प्रकाश पाचवीपर्यंत शिकलेले नाहीत तर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. 

मदन मोहन झा हे सातवीपर्यंत शिकलेले नाही तर त्यांनी 'पीएचडी' मिळवलीय. 

शिक्षण मंत्री आणि राज्य काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चौधरी यांचं दहावीपर्यंत शिक्षण झाल्याचं या पोस्टमध्ये म्हटलंय. पण खरं तर त्यांनी 'पीएचडी' पूर्ण केलीय. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.