भागलपूर: बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान शांततेत पार पडलंय. 49 जागांसाठी 583 उमेदवारांचं भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झालंय. पहिल्या टप्प्यात 13 हजार 212 मतदान केंद्रावर हे मतदान पार पडलं. या पहिल्या टप्प्यात 57 टक्के मतदान झालयं.
आणखी वाचा - बिहारमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू
2010 साली झालेल्या मतदानाच्या तुलनेत हे प्रमाण 6.15 टक्क्यांनी जास्त आहे. पहिल्या टप्प्यात 59.5 टक्के महिलांनी तर 54.5 टक्के पुरुष मतदारांनी मतदान केलं.
बांका, जमुई आणि भागलपूर जिल्ह्यातील तुरळक घटना सोडता मतदान शांततेत पार पडलं. सकाळ पासूनचं बहुतांश ठिकाणी मतदारांच्या रांगा बघयाला मिळाल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तब्बल 90 हजार पोलीस तैनात करण्यात आले होते.
आणखी वाचा - मोदी बोलले, हिंदू-मुस्लिमांनी एकत्रपणे गरीबीविरोधात काम करावे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.