www.24taas.com, नवी दिल्ली
आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधानपदाच्या उमेदवारांवरून एनडीएमध्ये खडाजंगी थांबण्याचे नाव घेतल नाही. आतापर्यंत नरेंद्र मोदी यांना भविष्यातील पंतप्रधान म्हणून त्यांची स्तुती करणारा संघ परिवार आता बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांचे गोडवे गात आहे. त्यामुळे आता मोदींची अडचण वाढली आहे. गुड गव्हर्नन्सच्या बाबतीत बिहार गुजरातपेक्षा आघाडीवर असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली काही परदेशी पत्रकारांशी बोलताना मोहन भागवत यांनी नीतिश कुमारांची प्रशंसा केली आहे. आतापर्यंत देशात गुड गव्हर्नन्ससाठी गुजरातचे मॉडेल मानले जात होते. आता त्याला नीतिश कुमारांच्या बिहारने गुजरात मॉडेलला आव्हान दिले आहे. बिहारमध्ये या पूर्वी विकासाची संपूर्ण शक्यता संपली होती, त्या ठिकाणी नीतिश कुमार यांनी किमया घडवून आणली आहे. चांगले काम करून नीतिश कुमार यांनी नवे मॉडेल जगासमोर ठेवले आहे. हे माझे मत नाही तर हे जनसामान्यांचे मत असल्याचेही मोहन भागवत यांनी स्पष्ट केले आहे.
आगामी काळात भाजपकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असणार या प्रश्नावर उत्तर देण्याचे भागवत यांनी टाळले. ते म्हणाले, याचे उत्तर भाजप आणि एनडीए एकत्र बसून घेतली. हा अधिकार त्यांचा आहे माझा नाही.