जमावाने कपडे फाडून धिंड काढल्याप्रकरणी परदेशी विद्यार्थिनी तक्रार

 संतप्त जमावाने मारहाण करत कपडे फाडून धिंड काढल्याप्रकरणी टांझानियाच्या विद्यार्थिनीची पोलिसांत तक्रार दाखल केली.

Updated: Feb 3, 2016, 07:30 PM IST
जमावाने कपडे फाडून धिंड काढल्याप्रकरणी परदेशी विद्यार्थिनी तक्रार title=

बंगळुरू :  संतप्त जमावाने मारहाण करत कपडे फाडून धिंड काढल्याप्रकरणी टांझानियाच्या विद्यार्थिनीची पोलिसांत तक्रार दाखल केली.

बंगळुरूतील मेडिकल विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या २१ वर्षीय टांझानियान विद्यार्थिंनीच्या गाडीचा गेल्या रविवारी उत्तर बंगऴुरुमधील गणपतीनगरमध्ये अपघात झाला. 

या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. या घटनेमुळे येथील संतप्त जमावाने या विद्यार्थिंनीसह तिच्यासोबत असलेल्या सहका-या मारहाण केली. तसेच, त्यांचे कपडेही फाडले आणि त्यांची गाडी पेटवून दिली. 

दरम्यान, या घटनेमुळे घाबरलेल्या या विद्यार्थिनीने जमावाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच टांझानियनच्या राजदूत कार्यालयाकडे मदत मागितली आहे.