'इसिस'चं ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या 'त्या' भारतीयाला अटक

दहशतवादी संघटना ‘इसिस’चं ट्विटर अकाऊंट हाताळणाऱ्या संशयित आरोपीला बंगळुरुमध्ये अटक करण्यात आलीय. मेहंदी असं या संशयीताचं नाव असून तो बंगळुरुतून हे अकाऊंट चालवत असल्याचा त्याच्यावर संशय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता गुन्हेशाखेकडून त्याचा शोध सुरू होता मात्र अखेर आज त्याला अटक करण्यात आलीय.

Updated: Dec 13, 2014, 01:40 PM IST
'इसिस'चं ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या 'त्या' भारतीयाला अटक title=

नवी दिल्ली : दहशतवादी संघटना ‘इसिस’चं ट्विटर अकाऊंट हाताळणाऱ्या संशयित आरोपीला बंगळुरुमध्ये अटक करण्यात आलीय. मेहंदी असं या संशयीताचं नाव असून तो बंगळुरुतून हे अकाऊंट चालवत असल्याचा त्याच्यावर संशय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता गुन्हेशाखेकडून त्याचा शोध सुरू होता मात्र अखेर आज त्याला अटक करण्यात आलीय.

बंगळुरुच्या एका आयटी कंपनीमध्ये नोकरी करणारा मेहंदी सोशल वेबसाईट ट्विटरच्या माध्यमातून जगभरात हिंसेचा प्रचार करत होता. त्यानं आत्तापर्यंत ३० तरुणांना 'इसिस'मध्ये सहभागी करून घेतल्याचं समजतंय. याच प्रकरणात आज बंगळुरू पोलीस आज एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. 

'इस्लामिट स्टेट'चं (इसिस) सोशल वेबसाईट ट्विटर अकाऊंट एक भारतीय ऑपरेट करतोय, अशी बातमी ब्रिटनच्या एका चॅनलनं दिली होती. ब्रिटनच्या 'चॅनल ४'नं केलेल्या दाव्यानुसार, इसिस समर्थक ट्विटर अकाऊंटवर हा खुलासा करण्यात आला. ट्विटरवर 'इसिस'चं अकाऊंट सांभाळणारा एक भारतीय व्यक्ती असल्याचा दावा करण्यात आला. यानंतर गुप्तचर यंत्रणांनी चौकशी सुरू करून मेहंदी मसरूर विस्वास नावाच्या या संशयित आरोपीला अटक केलीय.  

इसिसचं हे अकाउंट एक भारतीय व्यक्ती सांभाळतो. या व्यक्तीचं नाव मेहंदी असं आहे... तसंच मेहंदी हा बंगळुरूमध्ये एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करतो. तिथं तो एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतोय. मेहंदीला 'इसिस'मध्ये सहभागी व्हायचंय, असाही दावा यामध्ये करण्यात आलाय. 

या खुलाशानंतर ट्विटरवर @shamiwitness हे अकाऊंट बंद करण्यात आलंय. हे अकाऊंटचे १७ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. महिन्याला २० लाख लोक या अकाऊंटला भेट देतात. याच ट्विटर हँडलवरून सीरियाच्या सैनिकांच्या हत्येचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता, असंही समजतंय.

'इसिस'बद्दलच्या या खुलाशाबद्दल बंगळुरू पोलिसांनी आपली या संपूर्ण प्रकरणावर नजर आहे तसंच आपण गुप्तचर यंत्रणेच्याही संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. 
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.