कन्हैयाच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा

विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्या शरीरावर मारहाणी झाल्याच्या खुणा आहेत.

Updated: Feb 20, 2016, 01:36 AM IST
कन्हैयाच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा title=

नवी दिल्ली : विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्या शरीरावर मारहाणी झाल्याच्या खुणा आहेत, अशी माहिती वैद्यकीय अहवालातून पुढे आली आहे.  जेएनयूमध्ये झालेल्या देशविरोधी आंदोलनाबद्दल देशद्रोहाच्या आरोपाखाली कन्हैया कुमारला अटक करण्यात आली आहे. 

पतियाळा हाउस न्यायालयात त्याच्यावर हल्ला झाला होता. याप्रकरणाचा वैद्यकीय अहवाल शुक्रवारी हाती आला आहे. यामध्ये म्हटले आहे की, 'कन्हैया कुमार याच्या शरीरावर विविध ठिकाणी मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत. नाक, पाय आणि टाचेवर जखमा दिसत आहेत.