मुंबई : सर्वसामान्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. देशभरातल्या बँक कर्मचाऱ्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे.
बँकांच्या खासगीकरणारा विरोध, नोटाबंदी आणि त्यातून झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या नुकसानाचा निषेध, बँकिंग कामाच्या आऊटसोर्सिंगला विरोध... या आणि इतर मुद्द्यांवरुन हा संप पुकारण्यात आला आहे.
या संपामध्ये राष्ट्रीयकृत बँकांसह, ग्रामीण तसंच सहकारी बँका आणि खासगी बँकाही सहभागी होत आहेत.
देशभरातले तब्बल 10 लाख बँक कर्मचारी या संपात सामील होत आहेत. त्यामुळे बँकांचे व्यवहार आज पूर्णतः ठप्प होणार आहेत.