www.24taas.com, बंगळुरू
बंगळुरूत मल्लेश्वरम परिसरात झालेला स्फोट हा सिलेंडर स्फोट नसून बॉम्बस्फोट असल्याची शक्यता बंगळुरू पोलिसांनी व्यक्त केलीय.
बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास बंगळुरूमध्ये झालेल्या स्फोटात १४ जण गंभीर जखमी आहेत. जखमींमध्ये आठ पोलीस आणि सहा नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी स्फोटाच्या आजुबाजुचा परिसर सील केलाय. घटनेनंतर थोड्याच वेळात बंगळुरूचे पोलीस आयुक्तदेखील घटनास्थळी दाखल झालेत.
सुरुवातीला हा सिलेंडरचा स्फोट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, पोलीस आयुक्तांनी ही शक्यता फेटाळून लावलीय. हा स्फोट घडवण्यासाठी आयडीचा वापर केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय. हा स्फोट घडवून आणण्यासाठी पुन्हा एकदा बाईकचा वापर झाल्याची माहिती मिळतेय.