६,८०० जणांनी सोडलंय बंगळुरू

गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही पूर्वेत्तर राज्यांतील हजारो नागरिकांनी बंगळुरूहून अनेक नागरिकांचं पलायन सुरूच आहे. आत्तापर्यंत ६,८०० लोकांना स्थलांतर केल्याचं समजतंय

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 17, 2012, 07:35 AM IST

www.24taas.com, बंगळुरू
कर्नाटक सरकारद्वारा दिल्या गेलेल्या सुरक्षा आश्वासनांमुळे नागरिकांना मात्र धीर मिळालेला नाही. गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही पूर्वेत्तर राज्यांतील हजारो नागरिकांनी बंगळुरूहून अनेक नागरिकांचं पलायन सुरूच आहे. आत्तापर्यंत ६,८०० लोकांना स्थलांतर केल्याचं समजतंय. तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नागरिकांना सतर्क करत देशात शांतता ठेवण्याचं आवाहन केलंय.
आसाममध्ये झालेल्या हिंसेनंतर पूर्वेतील राज्यांमधून इतर राज्यांत स्थलांतरित झालेले नागरिक पुन्हा आपापल्या घराची वाट पकडताना दिसतायत. बुधवारपासून आत्तापर्यंत जवळजवळ ६,८०० लोकांनी बंगळुरहून पलायन केलंय. त्यासाठी गुवाहाटीकडे खास दोन रेल्वे सोडाव्या लागल्या. मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलाविली. ईशान्येकडील नागरिकांना तत्काळ सुरक्षा पुरविण्याचे आणि अफवा पसरविणार्याीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेला दिले आहेत. या भागांतही छोट्या-मोठ्या हिंसेच्या घटना घडल्या पण पोलिसांमध्ये तक्रार दाखल न झाल्यामुळे त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही, यावर मुख्यमंत्र्यांनीदेखील शिक्कामोर्तब केलंय.
या प्रश्नाला गंभीरतेनं घेऊन पूर्वेत्तर राज्यांतील नागरिकांसाठी मुख्यमंत्री शेट्टार यांनी एक हेल्पलाईन आणि नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा केलीय. संवेदनशील भागांत पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवातही केल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

स्थलांतरितांसाठी ज्यादा रेल्वे
वेगवेगळ्या अफवांमुळे आसामच्या कोकराझार जिल्ह्याशी संबंधित असणाऱ्या अनेक इंजिनिअरिंगचे विद्यार्थ्यांना शहर सोडण्याचा मार्ग पत्करलाय. बंगळुरू – गुवाहाटी एक्सप्रेस तुडुंब भरलेली दिसतेय. ही ट्रेन पकडण्यासाठी हजारो जणांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी केलीय. त्यासाठी गुवाहाटीकडे खास दोन रेल्वे सोडाव्या लागल्या. बंगळुरूमध्ये शहरातील इतर ठिकाणांपेक्षा रेल्वे स्टेशन या लोकांना सुरक्षित ठिकाण वाटू लागलंय.
मुंबई – पुणे – नाशिकमध्येही हेच चित्र
महाराष्ट्रातील मुख्य शहरांमध्येही हेच चित्र पाहायला मिळतंय. मुंबईमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर ईशान्येकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या खच्चून भरलेल्या दिसत आहेत. पुण्यात ईशान्य भागातील आसामी विद्यार्थ्यांवर मुस्लिमबहुल भागात हल्ले झाले. काही हल्लेखोरांना अटकही केली आहे; पण हे विद्यार्थी आणि नागरिक भयभीत आहेत. गुरुवारी पुणे स्टेशनवर घरी जाण्यासाठी ईशान्येकडील नागरिकांची तोबा गर्दी उसळली. ईशान्य भागातील हे नागरिक बहुतांशी विद्यार्थी आणि नोकर्यां साठी महाराष्ट्रात आलेले आहेत. नाशिकमध्ये रेल्वे स्टेशनवर अशीच गर्दी उसळली आहे.