लखनऊ: भारतीय बॅट्समन सुरेश रैनाची फुकटेगिरी समोर आली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या पेन्शन योजनेसाठी सुरेश रैना आणि काही दिग्गजांनी अर्ज केला आहे.
उत्तर प्रदेशचं नाव मोठं करणाऱ्यांसाठी महिन्याला 50 हजार रुपये पेन्शनची योजना सरकारनं सुरु केली. त्याचा लाभ मिळावा म्हणून सुरेश रैना, राज बब्बर, नवाजुद्दिन सिद्दीकी यांनी हे अर्ज केले आहेत.
सुरेश रैना हा कोट्यवधी रुपये कमवत आहे, तर नवाजुद्दिन सिद्दीकीही आता बॉलीवूडमध्ये चांगल्यापैकी रक्कम मिळवत आहे. खासदार असलेले राज बब्बर हे खासदारांना असलेल्या सगळ्या सुविधांचा लाभ घेत आहेत.
त्यामुळे या पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्याच्या फुकटेपणावर टीका होऊ लागली आहे. या सगळ्यांवर टीका होत असतानाच बच्चन कुटुंबियांनी मात्र आदर्श घालून दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारची ही पेन्शन घ्यायला अमिताभ, अभिषेक आणि जया बच्चन यांनी नकार दिला आहे.