'पाकिस्तानवर हल्ला करा' उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

Updated: Aug 25, 2014, 10:10 PM IST
'पाकिस्तानवर हल्ला करा' उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी title=
मुंबईः आता भारताने पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे, अशी मागणी एनडीएतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. पाकिस्तानकडून पुन्हा पुन्हा होणाऱ्या हल्ल्यामुळे उद्धव ठाकरेंनी पाकिस्तानवर हल्ला करून आता त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे असे म्हटलं आहे. 

शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तील अग्रलेखात म्हटलं आहे की, 'पाकिस्तानने सीमा भागातील १३ गावांवर हल्ले केले. जम्मूमध्ये 22 चौकीवर गोळीबार केला. या गोळीबारात दोन जण ठार झालीत आणि काही जण जखमी झालीत. यामुळे अनेक लोकांना गावं सोडावी लागली. 2003 नंतर ही आपल्याकडील सर्वात मोठी घटना आहे. मागील एक महिन्याच्या दरम्यान पाकिस्तानने भारतावर २५ हल्ले केले, पण आम्ही भिजलेल्या फटाक्यासारखे चुपचाप बसलो आहोत.

उद्धव ठाकरेंनी म्हटलं की अशा स्थितीत पाकिस्तान सोबत चर्चा किंवा बैठका करणे व्यर्थ आहे. भारताने पाकिस्तानच्या सचिवांसोबतची चर्चा स्थगित करून नाराजी जाहीर केली आहे. पण हे पुरेसं नाही आहे. आता आपल्याला पाकिस्तानच्या सीमा भागात घुसून त्यांना धडा शिकवला पाहिजे. 

आता देश अपेक्षा करतो आहे की पाकिस्तानच्या शेपटीला आग लावून खाक केलं पाहिजे. आता यात उशीर करू नये यावर कारवाई करून त्यांना दाखवण्याची गरज आहे की हा मर्दांचा देश आहे. देशाच्या लोकांसमोर हे सिद्ध करा की एक सशक्त सरकारने दिल्लीची सत्ता सांभाळली आहे. आमची केंद्राला हिच विनंती आहे.'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.