सराफा बाजारात चढ-उतार कायम, सोनं घसरलं, चांदी स्थिर

दिल्ली सराफा बाजारात सलग तिसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा भाव २५००० रुपयांवरून घसरत २४९८० रुपये प्रति १० ग्रामवर आला.

Updated: Aug 9, 2015, 12:40 PM IST
सराफा बाजारात चढ-उतार कायम, सोनं घसरलं, चांदी स्थिर title=

नवी दिल्ली: दिल्ली सराफा बाजारात सलग तिसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा भाव २५००० रुपयांवरून घसरत २४९८० रुपये प्रति १० ग्रामवर आला.

आठवड्याच्या अखेरच्या सत्रात लिवाली समर्थनामुळे बाजारात थोडी सुधारणा झाली आणि १२५ रुपयांच्या घसरणीसह २५१७५ रुपयांवर बाजार बंद झाला. तर खरेदी-विक्री दरम्यान चांदीचे दर कोणत्याही फायद्या-तोट्या विना ३४३०० रुपये प्रति किलो राहिले. बाजार सूत्रांनुसार आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरण आणि दागिने निर्मितीच्या मागणीतील कमतरता यामुळं सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत.

दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोनं २४,९८० , २३ कॅरेट २४८३९ रुपये प्रति १० ग्राम होतं. ६ ऑगस्ट २०११ नंतर हे सर्वात कमी भाव ठरला. तर चांदीचे दर ३४३०० रुपये किलो इतके राहिले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.