मालवणीतून बेपत्ता अयाजवर गुन्हा दाखल

मालवणीतून बेपत्ता झालेल्या 3 तरुणांपैकी अयाज सुलतान याच्या विरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते तरुण आयसिसमध्ये शामिल होण्यासाठी गेले असल्याचा पोलिसांना संशय होता. 

Updated: Dec 30, 2015, 11:21 PM IST
मालवणीतून बेपत्ता अयाजवर गुन्हा दाखल title=

मुंबई : मालवणीतून बेपत्ता झालेल्या 3 तरुणांपैकी अयाज सुलतान याच्या विरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते तरुण आयसिसमध्ये शामिल होण्यासाठी गेले असल्याचा पोलिसांना संशय होता. 

एटीएसने बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अयाजवर गुन्हा दाखल केला आहे. अयाझ ३० ऑक्टोबरपासून बेपत्ता झाला असून तो काबूलमध्ये असल्याची शक्यता एटीएसकडून वर्तवण्यता येत होती. अयाझसोबत बेपत्ता झालेले दोन तरुण काही दिवसांपूर्वीच घरी परतले आहेत. 

अयाझ आयस‌िसच्या विचारसरणीने प्रभाव‌ित झाला होता. तसेच, तो इतर तरुणांनाही आयस‌िसमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साह‌ित करत असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली होती. झी मीडियाच्या प्रतिनिधीनेही अयाज सोबत संपर्क साधला तेव्हा तो आयसिसशी प्रभावित असल्याचंच दिसत होतं. 

१ नोव्हेंबरला अयाझने द‌िल्लीहून काबूलला गेला असल्याचा एटीएसला संशय आहे. अयाज हा दशवादी संघटनेत सहभागी होण्यासाठीच गेला असल्याची माहिती असल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.