उरी : जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 17 जवान शहीद झाले आहेत. तर चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं आहे.
लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंग बादल, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि गृहमंत्री राजनाथ सिंग हे जम्मू काश्मीरला जाणार आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका आणि रशिया दौरा त्यांनी रद्द केला आहे. मनोहर पर्रिकर तातडीनं जम्मू काश्मीरला रवाना झाले आहेत. लष्कराकडून अजूनही कोम्बिंग ऑपरेशन आणि शोध मोहीम सुरु आहे.
उरी इथल्या लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे 5.30च्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. लष्कराच्या 12 ब्रिगेड मुख्यालयावर हा हल्ला करण्यात आला.