मुंबई : हजार-पाचशेच्या नोटा रद्द केल्यामुळं नागरिकांनी जुन्या नोटा बँकेत जमा केल्या आहेत. तब्बल तीन लाख कोटींपेक्षा जास्त पैसे बँकांमध्ये जमा झाले आहेत. त्यामुळं कर्जावरील व्याज दर कमी केली जाण्याची शक्यता आहे.
'स्टेट बँक ऑफ इंडिया'च्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी यासंदर्भात विश्वास व्यक्त केला आहे. गर्दी कमी झाल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून पुढल्या काळात पन्नास आणि वीस रुपयाच्या नोटा मिळणार असल्याची माहिती भट्टाचार्य यांनी दिलीय.
भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसबीआयच्या एटीएममधून येत्या काही दिवसांत २० आणि ५० रुपयांच्या नोटाही मिळणार आहेत. येत्या ५० दिवसांच्या आत सद्य परिस्थितीत सुधारणा होण्याची आशा त्यांनी व्यक्त केलीय.
सोबतच त्यांनी नागरिकांना जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैशांचं ट्रान्झॅक्शन करण्याचा सल्ला दिलाय.