www.24taas.com, नवी दिल्ली
किरकोळ व्यापार क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीच्या निर्णयावर सध्या पूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. विदेशी गुंतवणुकीत ५१ टक्के वाढ केल्याने सामान्य जनतेत आणि राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपा नेते अरूण जेटली यांनी विदेशी गुंतवणुकीसंदर्भात बोलताना निवेदन केलं, की विदेशी गुंतवणुकीला परवानगी मिळाल्यास भारत ‘सेल्सबॉइज’ किंवा ‘सेल्सगर्ल्स’चा देश बनेल.
राज्यसभेचे प्रतिपक्षी नेते आणि पार्टीचे वरिष्ठ नेते अरूण जेटली यांनी म्हटले, की भारतीय बाजारपेठेत एफडीआय केवळ किरकोळ उत्पादनांसाठीच नव्हे, तर सेवा क्षेत्रासाठीही धोकादायक आहे, यामुळे उत्पादन क्षेत्रात समोर मोठे संकट निर्माण होणार आहे.
त्यांनी एका सभेत असे म्हटले की, आंतरराष्ट्रीय किरकोळ क्षेत्राचा स्त्रोत आंतरराष्ट्रीय स्तरावर होतो आणि घरगुती बाजाराचा स्त्रोत घरगुती स्तरावर होतो. भारताने उत्पादन क्षेत्रात कुठल्याही प्रकारची सुधारणा केलेली नाही. अशा परिस्थित अमेरिकन आणि युरोपीय कंपन्या स्वस्त चिनी सामानाबरोबर भारतीय बाजारपेठेवर कब्जा करू पाहत आहे. या कारणांमुळे भारताची “ सेल्स बॉय किंवा सेल्स गर्ल “ देश बनण्याची शक्यता आहे.