बडोदा : गुजरातमध्ये नोकर आणि मालक यांच्यातील एका अनोख्या नात्याची प्रचिती आली आहे. बडोद्यात एका व्यक्तीनं प्राण सोडताना आपल्या नोकराला करोडपती केलंय.
त्याचं झालं असं की, जेरामभाई पटेल हे एक प्रसिद्ध चित्रकार होते. पण त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांची साथ सोडली. या काळात त्यांना सोबत दिली ती त्यांचा नोकर असलेल्या डाहया मारवाडीनं.
डाहया वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांच्याकडे राहून त्यांची सेवा करत होता. तब्बल ४२ वर्षे त्यांनी पटेल यांची सेवा केली.
म्हणूनच जेरामभाईंनी डाहयाच्या बँकेच्या खात्यात १ कोटी रुपयांची रक्कम जमा केली. त्याचसोबत त्याला त्यांच्या हवेलीचाही हिस्सेदार म्हणून स्थान दिलं.
जेरामभाई पटेल यांनी त्यांच्याजवळील अनेक शिल्प विकून एकंदर सहा कोटी रुपये जमा केले होते.