IAS अधिकाऱ्याची मग्रुरी सोशल मीडियावर वायरल

एका आएएस अधिकाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय... या अधिकाऱ्याची मग्रुरी या फोटोतून दिसून येतेय.    

Updated: May 4, 2016, 05:20 PM IST
IAS अधिकाऱ्याची मग्रुरी सोशल मीडियावर वायरल title=

रायपूर : एका आएएस अधिकाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय... या अधिकाऱ्याची मग्रुरी या फोटोतून दिसून येतेय.    

छत्तीसगडमधला हा फोटो आहे. बलरामपूर जिल्ह्याच्या रामानुजगंजमध्ये एसडीएम पदावर हा अधिकारी कार्यरत आहे. डॉ. जगदीश सोनकर असं त्याचं नाव आहे.

सरकारी अधिकाऱ्याची मग्रुरी 

सरकारी योजनेंतर्गत संचालित पोषण पुनर्वास केंद्रात कुपोषित मुलांची विचारपूस करण्यासाठी सोनकर हॉस्पीटलमध्ये दाखल झाला होता. परंतु, यावेळी ही कुपोषित मुलं ज्या बेडवर झोपली होती त्यावर पाय ठेऊन उभा असलेला हा अधिकारी या फोटोत दिसतोय. 

वर्तन आक्षेपार्ह

एमबीबीएचं शिक्षण घेऊन भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालेल्या अधिकाऱ्याकडून हे वर्तन आक्षेपार्ह असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. जनतेसमोर अधिकाऱ्यांच्या वर्तनालाही मर्यादा असतात. त्या न पाळल्यानं या अधिकाऱ्याला सोशल मीडियावर टीकेचा धनी व्हावं लागलंय.