नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकने लष्कर आणि सरकारने दहशतवाद्यांशी निपटण्यासाठी मोठी योजना तयार केली आहे. लष्कराने म्हटलं आहे की, सरकारने फक्त ६ महिन्यांचा वेळ द्यावा. या दरम्यान पीओकेमधल्या सगळ्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्धवस्त करुन टाकू.
लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 'लाईन ऑफ कंट्रोलच्या दुसऱ्या बाजूस सर्जिकल स्ट्राइकनंतर अधिकाऱ्यांनी म्हटलं की, अधून-मधून हल्ले करुन दहशतवाद्यांना नाही संपवता येणार. एकाच वेळी मोठी कारवाई करण्याची गरज आहे.
सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी असं ही म्हटलं की, काश्मीरमधील परिस्थिती आणि देशातील इतर भागांमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यांशी निपटण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. रविवारी बारामुल्लामध्ये पुन्हा एकदा सेनेच्या कॅम्पवर हल्ला झाला होता.
आर्मीच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं की, आपल्याला एकाच वेळी अभियान चालवावं लागेल. दहशवाद्यांना आपण बॅकफूटवर तर टाकू पण त्यांच्यावर कायमचा बंदोबस्त करण्यासाठी एक मोठी योजना आखावी लागेल. त्यासाठी लष्कराने ६ महिन्यांची मुदत मागितली आहे.
अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, पाकिस्तानात बसलेले दहशतवाद्यांचे गुरु हे भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर बदला घेण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी ते अनेक दहशतवादी पाठवतील. पीओकेमध्ये दहशतवादी आणखी काही ठिकाणं तयार करु शकतात. यासाठी या ठिकाणांनाच आधी संपवलं पाहिजे. काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवण्याचं देखील लष्कराने सरकारला सांगितलं आहे.
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करणारे लोकं दहशतीत आहे आणि कारवाईसाठी ही चांगली संधी आहे. त्यामुळे आताच मोठी कारवाई केली पाहिजे असं लष्काराच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे.