पाहा डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची केवढी ही मालमत्ता

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची मालमत्ता केवढी आहे, हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. डॉ. कलाम यांच्यासोबत काम करणारे शास्त्रज्ञ सल्लागार व्ही पोनराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील ६४ कोटी युवक हीच कलामाची मालमत्ता आहे, या शिवाय कलाम यांच्यामागे कोणतीही मालमत्ता नसल्याचं पोनराज यांनी म्हटलं आहे.

Updated: Aug 3, 2015, 09:22 PM IST
पाहा डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची केवढी ही मालमत्ता title=

रामेश्‍वरम : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची मालमत्ता केवढी आहे, हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. डॉ. कलाम यांच्यासोबत काम करणारे शास्त्रज्ञ सल्लागार व्ही पोनराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील ६४ कोटी युवक हीच कलामाची मालमत्ता आहे, या शिवाय कलाम यांच्यामागे कोणतीही मालमत्ता नसल्याचं पोनराज यांनी म्हटलं आहे.

कलाम यांची सुरूवातीला बंगळुर येथे मालमत्ता होती, पण त्यांनी ती सार्वजनिक कामासाठी देऊन टाकली, याशिवाय कोणतीही मालमत्ता कलामांची नसल्याचं पोनराज म्हणतात.

मात्र सरकारकडून निवृत्ती वेतनाशिवाय कलाम यांना, त्यांच्या पुस्तकाची रॉयल्टी नियमित मिळत होती, असंही पोनराज यांनी सांगितलं. पोनराज यांनी दोन दशकाहून अधिक काळ डॉ. कलाम यांच्यासोबत काम केलं होतं, ते शास्त्रज्ञ आहेत तसेच ते कलामांचे सल्लागार होते.

कलाम यांचा वारसाची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही, त्यांच्या कुटुंबियांशी बोलल्यानंतर यावर मार्ग काढला जाणार असल्याचं, पोनराज यांनी म्हटलं आहे.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं २७ जुलै रोजी शिलाँग येथे एका कार्यक्रमात निधन झाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.