'संजय दत्तला एके-४७ दिल्यानंतर दाऊदच्या घरात पेटलं घमासान'

१९९३ च्या बॉम्बस्फोटादरम्यान, बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याच्याकेड काही हत्यारं दिल्यानंतर दाऊदच्या घरात भांडणं होऊन घमासान पेटलं होतं, असा दावा केल्या दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी... 

Updated: Nov 20, 2015, 07:01 PM IST
'संजय दत्तला एके-४७ दिल्यानंतर दाऊदच्या घरात पेटलं घमासान' title=

नवी दिल्ली : १९९३ च्या बॉम्बस्फोटादरम्यान, बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याच्याकेड काही हत्यारं दिल्यानंतर दाऊदच्या घरात भांडणं होऊन घमासान पेटलं होतं, असा दावा केल्या दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी... 

संजय दत्तकडे दाऊदचा भाऊ अनीशनं काही हत्यारं सोपवली होती. ही गोष्ट समजल्यानंतर दाऊद आपल्या भावावर भयंकर नाराज झाला होता. यामुळे, त्यानं आपल्या भावाला चांगलाच चोपही दिला होता, असं नीरज कुमार यांनी आपल्या 'डी फॉर डॉन' या पुस्तकात केलाय. 

आपण जेव्हा दाऊदला याबद्दल विचारलं, तेव्हा त्यानं अनिशनं संजय दत्तला हत्यारं दिल्याचं कबूल केलं होतं, याची कबुली दिली. अनिश आणि संजय दत्तची भेट दुबईमध्ये झाली होती. त्यावेळी संजयच्या 'यलगार' या सिनेमाचं शूटींग तिथं सुरू होतं. 

संजय दत्तनं ही हत्यारं आपल्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी मागितली होती आणि अनिशनं त्याला ती पुरवली होती. याच प्रकरणी संजय दत्त सध्या तुरुंगात शिक्षा भोगतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.