मुंबई : पंतप्रधान मोदींनी आज काळा पैशाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेत मोदींनी काळा पैसा जवळ बाळगणाऱ्यांना मोठा दणका दिला. देशाला संबोधित करत पंतप्रधान मोदींनी हा निर्णय जनतेच्या समोर ठेवला.
पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी स्वागत केलं आहे. पंतप्रधानांचा हा निर्णय म्हणजे काळ्या पैशावर केलेला सर्जिकल स्टाईक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा आज मध्य रात्रीपासून बंद होणार आहेत. 100, 50, 20, 10, 5, 2 आणि 1 रूपयाची नोट आणि नाणे यांचा उपयोग करता येणार आहे. 10 ते 30 डिसेंबरपर्यंत 500 आणि 1000 च्या नोटा बँकांमध्ये जमा करायचे आहेत. 11 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत पेट्रोल पंप आणि सीएनजी स्टेशनवर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्विकारणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे उद्या सगळ्या बँका बंद राहणार आहेत.
पंतप्रधानांचा हा निर्णय म्हणजे काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक -
अमित शहा