अमेरिका आणि भारताचे सैनिक दहशतवादाविरुद्ध आले एकत्र

उत्तराखंडमध्ये रानीखेत येथील जंगलांमध्ये सुपरपावर असणाऱ्या अमेरिकेचे सुपर कमांडो आणि भारताचे जवान दहशतवाद्यांविरोधात लढण्याचा एकत्र युद्ध अभ्यास करत आहेत. दहशदवाद्यांना जोरदार प्रत्यूत्तर देण्यासाठी भारत आणि अमेरिकेचे जवान एकत्र सराव करत आहेत.

Updated: Sep 25, 2016, 07:50 PM IST
अमेरिका आणि भारताचे सैनिक दहशतवादाविरुद्ध आले एकत्र title=

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये रानीखेत येथील जंगलांमध्ये सुपरपावर असणाऱ्या अमेरिकेचे सुपर कमांडो आणि भारताचे जवान दहशतवाद्यांविरोधात लढण्याचा एकत्र युद्ध अभ्यास करत आहेत. दहशदवाद्यांना जोरदार प्रत्यूत्तर देण्यासाठी भारत आणि अमेरिकेचे जवान एकत्र सराव करत आहेत.

२६ सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या या सराव अभ्यासात प्रत्येक देशाचे २२५ जवान असणार आहेत. देशातील १२ मद्रास रेजिमेंटचे जवान हा सराव अभ्यास करत आहेत. दोन्ही देशांच्या तिन्ही लष्कर वेगवेगळ्या युद्ध अभ्यासात भाग घेत आहेत. भारताच्या सैनिकांकडे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढण्याचा अनुभव आहे आणि अमेरिकेच्या सैनिकांकडे इराक आणि अफगानिस्तानमध्ये लढण्याचा अनुभव. दोन्ही सेना घुसखोरी आणि दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी कसून अभ्यास करत आहेत.