गोव्यात मित्रपक्षांनी पाठिंब्यासाठी भाजपसमोर ठेवली एक अट

भाजप गोव्यात सत्ता स्थापन करणार असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. भाजपाकडे बहुमताचा आकडा असल्याचं भाजपकडून दावा करण्यात आला आहे. मित्रपक्षाशी बोलणं झालं असून फक्त समर्थन पत्रासाठी वाट बघत असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण मित्रपक्षाने समर्थन देण्याआधी एक अट भाजपसमोर ठेवली आहे.

Updated: Mar 12, 2017, 10:53 AM IST
गोव्यात मित्रपक्षांनी पाठिंब्यासाठी भाजपसमोर ठेवली एक अट title=

पणजी : भाजप गोव्यात सत्ता स्थापन करणार असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. भाजपाकडे बहुमताचा आकडा असल्याचं भाजपकडून दावा करण्यात आला आहे. मित्रपक्षाशी बोलणं झालं असून फक्त समर्थन पत्रासाठी वाट बघत असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण मित्रपक्षाने समर्थन देण्याआधी एक अट भाजपसमोर ठेवली आहे.

मनोहर पर्रिकर मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आसतील तरच भाजपाला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा आणि गोवा फोरवर्ड पक्ष पाठिंबा देईल असं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुधीन ढवळीकर यांनी झी मीडियाला माहिती दिली आहे. मनोहर पर्रीकर गोव्यात परत येतील. मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली काम करायला आम्ही तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजप नेते नितीन गडकरी यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झाली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी मनोहर पर्रिकरांना पुन्हा गोव्यात पाठवता का हे पाहावं लागणार आहे.