अंघोळ केल्यानंतर अख्ख्या परिवाराला टक्कल पडलं

हँडपंपचं पाणी मोठं संकट घेऊन येऊ शकतं, कारण..

Updated: Feb 2, 2016, 02:58 PM IST
अंघोळ केल्यानंतर अख्ख्या परिवाराला टक्कल पडलं title=

मधुबनी : हँडपंपचं पाणी एखाद्या परिवारासाठी मोठं संकट घेऊन येऊ शकतं, कारण बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील लदनिया भागात एका हँडपंपच्या पाण्याने अंघोळ केल्यानंतर अख्ख्या परिवाराचे केस गळून गेले.

या हँडपंपचं पाणी तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे.

या कुटुंबाने या पाण्याने अंघोळ केल्यानंतर महिला पुरूष यांच्या डोक्यावरचे केस हातात आले, आणि संध्याकाळपर्यंत डोक्यावरील सर्व केस गळून गेले.

या परिवाराची ही स्थिती पाहून, आजूबाजूचे लोकही पाण्याच्या दहशतीत आले आहेत. प्रशासननाने आता हा हँडपंप सील केला आहे.

 तसेच या पाण्याचा ज्या कुटुंबावर परिणाम झाला, त्यांच्यावर याआधी कशाचा परिणाम आहे का याचीही चौकशी होत आहे. यामुळे एकाच वेळेस केस गळण्याचं कारणंही समोर येणार आहे.