गर्भलिंगनिदान चाचणी अनिवार्य करण्यात यावी - मनेका गांधी

कन्या भ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकारने गर्भलिंग निदान चाचणीवर घातलेली बंदी उठवली पाहिजे असं विधान केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी केलंय. 

Updated: Feb 2, 2016, 11:09 AM IST
गर्भलिंगनिदान चाचणी अनिवार्य करण्यात यावी - मनेका गांधी title=

नवी दिल्ली : कन्या भ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकारने गर्भलिंग निदान चाचणीवर घातलेली बंदी उठवली पाहिजे असं विधान केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी केलंय. जयपूर येथील एका परिषदेदरम्यान त्यांनी हे विधान केलंय. 

महिला गर्भवती राहिल्यानंतर ही चाचणी करुन गर्भाबाबतची माहिती पती-पत्नीला देण्यात यावी. यामुळे गर्भाची योग्य ती निगराणी राखण्यात मदत होईल. याबाबतचे माझे मत मी मांडले आहे. यावर चर्चा सुरु आहे. अद्याप कोणताही निर्णय़ झालेला नाही. एखाद्या जोडप्याला अॅबॉर्शन करायचे असल्यास त्यासाठीचे मेडिकल सर्टिफिकेट देणे गरजेचे असेल. 

यावेळी 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या कार्यक्रमाला प्रोत्साहन देताना देशातील आणखी ६१ जिल्ह्यांमध्ये या योजनेचा विस्तार केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला देशातील १०० जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली होती. या कार्यक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्या म्हणाल्या.