दहशतवाद्यांच्या रडारवर पंतप्रधान मोदी, मोदी मुस्लिम विरोधी- अल कायदा

दहशतवादी संघटना 'अल कायदा'नं पहिल्यांचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेतलंय. अलकायदाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये 'अमेरिका, संयुक्त राष्ट्र, वर्ल्ड बँक, नरेंद्र मोदी या सर्वांद्वारे मुस्लिमांविरुद्ध युद्ध सुरू करण्यात आलं आहे', असं यात म्हटलं गेलंय. 

Updated: May 4, 2015, 04:13 PM IST
दहशतवाद्यांच्या रडारवर पंतप्रधान मोदी, मोदी मुस्लिम विरोधी- अल कायदा title=

नवी दिल्ली: दहशतवादी संघटना 'अल कायदा'नं पहिल्यांचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेतलंय. अलकायदाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये 'अमेरिका, संयुक्त राष्ट्र, वर्ल्ड बँक, नरेंद्र मोदी या सर्वांद्वारे मुस्लिमांविरुद्ध युद्ध सुरू करण्यात आलं आहे', असं यात म्हटलं गेलंय. 

हा व्हिडिओ 'अल कायदा'ची भारतीय विंग (AQIS)नं जारी केलाय. एक्यूआयएसचा प्रमुख आसिम उमरनं या टेपमध्ये फ्रान्सपासून बांग्लादेशपर्यंतचा उल्लेख करत विष ओकलंय. या टेपमध्ये मोदी मुस्लिमांचे शत्रू असल्याचं म्हटलंय. आसिम भारतीय उप-महाद्वीपचा अलकायदा प्रमुख आहे. 

'जागतिक बँक आणि आतंरराष्ट्रीय नाणेनिधीमची धोरणं, ड्रोन हल्ले, शार्ली हेब्दोतील लिखाण, संयुक्त राष्ट्संघ आणि नरेंद्र मोदी यांची वक्तव्यं या सर्वांद्वारे मुस्लिमांविरुद्ध युद्ध सुरू करण्यात आलं आहे ', असं या व्हिडिओत म्हटलंय. 

'फ्रॉम फ्रान्स टू बांग्लादेश: दि डस्ट विल नेव्हर सेटल डाऊन' असं नाव असलेला हा व्हिडिओ २ मे रोजी जारी करण्यात आला असून त्यात भारतीय उपखंडातील  कारवायांचा प्रमुख असिम उमर याचा आवाज आहे. या व्हिडिओचं विश्लेषण केलं जात असल्याचं भारतीय गुप्तचर यंत्रणेतर्फे सांगण्यात येत आहे. 

तसंच फेब्रुवारीमध्ये अविजित रॉय याच्यासह अन्य चार ब्लॉगर्सच्या झालेल्या हत्यांची जबाबादारीही अल कायदानं घेतली आहे. 'अल कायदा'चा प्रमुख अयमान अल जवाहिरी यानं गेल्या वर्षी अल कायदाच्या भारतीय उपखंडातील शाखेची घोषणा केली होती. असिम उमरवर या शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.