किशोरवयीन मुलांनी केला गरोदर महिलेवर रेप, बनविला व्हिडिओ

 आंध्रप्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलासह दोन किशोर वयीन मुलांनी एका गरोदर महिलेवर गँगरेप केला. तसेच रेप करताना त्यांनी तिचा अश्लिल व्हिडिओ बनविल्याची तक्रार दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Updated: May 4, 2015, 02:44 PM IST
किशोरवयीन मुलांनी केला गरोदर महिलेवर रेप, बनविला व्हिडिओ title=

इलूरू :  आंध्रप्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलासह दोन किशोर वयीन मुलांनी एका गरोदर महिलेवर गँगरेप केला. तसेच रेप करताना त्यांनी तिचा अश्लिल व्हिडिओ बनविल्याची तक्रार दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पेडापाडू ठाण्याचे उपनिरीक्षक एस. विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार रामचंद्रपूरम गावात १८ वर्षीय पीडित महिला घरी एकटी होती. त्यावेळी तीन जण घरात घुसून तिच्यावर गँग रेप केला. घटनेनंतर महिलेने सायंकाळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

इलुरू डीएसपी सरिथा यांनी सांगितले की, निर्भया कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली असून फरार तिघांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.