www.24taas.com,झी मीडिया, बंगळुरु
भारताने तयार केलेला इन्सॅट-३ डी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेय. या उपग्रहामुळे हवामानाचा अंदाज आणि नैसर्गिक संकटाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
इन्सॅट-३ डी या उपग्रहाचे एरियनस्पेस या युरोपीय संस्थेच्या एरियन ५ या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने इन्सॅट-३ डी आणि अल्फासेट या उपग्रहांचे फ्रेंच गयाना येथील कोओरु येथून यशस्वीपणे उड्डान होऊन प्रक्षेपण करण्यात आले.
अल्फासेट हा युरोपमधील सर्वाधिक क्षमतेचा दूरसंचार क्षेत्रातील उपग्रह आहे. प्रथम अल्फासेट या उपग्रहाचे प्रक्षेपण केल्यानंतर पाच मिनिटांनी इन्सॅट-३ डी या उपग्रहाचेही यशस्वीपणे अवकाशात झेपावला. हवामानविषयक अंदाज नोंदविण्याच्या क्षमतेत यामुळे अधिक भर पडणार आहे. हा उपग्रह सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज आहे.
भारतामधील हसन येथील उपग्रह नियंत्रण व्यवस्थेस इन्सॅट-३ डी उपग्रहाकडून संदेश मिळू लागले आहेत, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे कार्याध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी प्रक्षेपणानंतर सांगितले. याआधीच्या कल्पना व इन्सॅट-३ ए या उपग्रहांच्या तुलतेन इन्सॅट-३ डी उपग्रहामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.