अच्छे दिन आले होsss! मोदींनी पिटला डंका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'यूएनआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत 'देशात अच्छे दिन आलेत' असा डंका पिटलाय. 

Updated: Jun 1, 2015, 08:41 PM IST
अच्छे दिन आले होsss! मोदींनी पिटला डंका title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'यूएनआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत 'देशात अच्छे दिन आलेत' असा डंका पिटलाय. 

'सरकारनं एका वर्षांत चांगलं काम केलंय... अच्छे दिन आणण्यात सरकारला यश आलंय. गेल्या एक वर्षांत चांगलं काम करून पारदर्शी सरकार देण्याचा प्रयत्न मोदी सरकारनं केलंय. आमच्या सरकारवर गेल्या वर्षभरात एकही भ्रष्टाचाराचा आरोप लागलेला नाही... गेल्या वर्षभरात भ्रष्टाचारच संपुष्टात आलाय' असं पंतप्रधान मोदींनी या मुलाखतीत म्हटलंय. 

कोणत्याही समुदायिक हिंसेला सरकार थारा देणार नाही. आम्ही जनतेशी निगडीत अनेक नव्या योजना सुरू केल्यात. या योजनांचे परिणाम दूरगामी आहेत. 

मोदी सरकारनं 26 मे रोजी आपल्या कामाकाजाला एक वर्ष पूर्ण केलंय. आमचं सरकार गरीबांचं सरकार आहे तसंच आम्ही गरीबांसाठी काम करणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.