हरवलेल्या आणि सापडलेल्या मुलांसाठी वेबपोर्टल

हरवलेल्या आणि सापडलेल्या मुलांसाठी 'खोयापाया डॉट जीओव्ही डॉट इन' हे नवं वेब पोर्टल सुरू करण्यात आलं आहे, यावर हरवलेल्या मुलांचा, व्यक्तींचा तपशील टाकता येणार आहे. यावरून कोणत्या राज्यातून किती जण दिवसातून हरवले आहेत, किती सापडले आहेत, याचा तपशील मिळणार आहे.

Updated: Jun 1, 2015, 08:22 PM IST
हरवलेल्या आणि सापडलेल्या मुलांसाठी वेबपोर्टल title=

मुंबई : हरवलेल्या आणि सापडलेल्या मुलांसाठी 'खोयापाया डॉट जीओव्ही डॉट इन' हे नवं वेब पोर्टल सुरू करण्यात आलं आहे, यावर हरवलेल्या मुलांचा, व्यक्तींचा तपशील टाकता येणार आहे. यावरून कोणत्या राज्यातून किती जण दिवसातून हरवले आहेत, किती सापडले आहेत, याचा तपशील मिळणार आहे.

सर्वच लोकांनी यावर हरवलेल्या अथवा सापडलेल्या लोकांचा तपशील टाकल्यास ही साईट हरवलेल्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे.

भारतात व्यक्ती हरवण्याचा प्रमाण वाढलेलं आहे, महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लहान मुलं हरवत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे ही साईट सर्वांसाठी मदतीचा हात ठरणार आहे, फक्त गरज आहे, हरवलेल्या व्यक्तीचा डेटा शेअर करणे, आणि सापडलेल्या व्यक्तीचाही डेटा शेअर करणे, यासाईट सोबत देशभरातील पोलिस स्टेशन्सकडे हरवलेल्या सापडलेल्या व्यक्तींची माहिती अपलोड केली जाईल का?, हे सर्वात महत्वाचे ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.