नवी दिल्ली : ‘पीके’ या हिंदी सिनेमा प्रमोशनशाठी अभिनेता आमिर खानने पाकिस्तानच्या आयएसआयची मदत घेतली, असा खळबळजनक आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय.
असहिष्णुतेसंदर्भातील वक्तव्यामुळे आमिर खान गेल्या काही दिवसांपासून वादाच्या गर्तेत सापडला आहे. मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांची त्याने नाराजी ओढवून घेतल्यामुळे त्याची ‘अतुल्य भारत’ मोहिमेतून गच्छंती झाली होती. असहिष्णुतेसंदर्भातील वक्तव्यामुळे टीकेचा धनी ठरलेल्या अभिनेता आमिर खानवर भाजप नेत्यांकडून सुरू असलेली टीकेची झोड थांबत नसल्याचे दिसत आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी आमिर खानवर नवा आरोप करत वादाला तोंड फोडले आहे. ‘पीके’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिरने पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेची मदत घेतल्याचे म्हटलेय.
Aamir Khan collaborated with Pak's ISI to promote his film PK: Subramanian Swamy pic.twitter.com/0jnmJnwhWY
— ANI (@ANI_news) January 16, 2016