नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाळगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडणार नाही असं म्हटलं होतं तर इमानदार व्यक्तीला त्रास होऊ देणार नाही असं देखील म्हटलं होतं.
पंतप्रधान मोदींनी गोवामध्ये घोषणा केली होती की, आता बेनामी संपत्ती बाळगणाऱ्यांचा नंबर आहे. बेनामी संपत्तीमध्ये पैसा गुंतवणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी आधार कार्डाचा आधार घेतला जाणार आहे. सरकार आधार नंबरवरुन अशा लोकांना घेरणार आहे.
सरकार बेनामी संपत्ती बाळगणाऱ्या लोकांवर आता कारवाई करण्याची तयारी करत आहे. यामुळे सगळ्या राज्यांचे आधार क्रमांक राजस्व रेकॉर्डशी जोडण्याची प्रकिया सुरु झाली आहे. आधार क्रमांकाचा वापर गॅस सबसिडी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील वापर होत होता. पण आता याचा वापर बेनामी संपत्ती असणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी देखील होणार आहे.