लग्न सभागृहाची भिंत कोसळून 24 ठार, वादळ-पावसाचा तडाखा

वादळ आणि पावसामुळे लग्न सभागृहाची भिंत कोसळल्याने 24 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात घडली आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 11, 2017, 08:07 AM IST
लग्न सभागृहाची भिंत कोसळून 24 ठार, वादळ-पावसाचा तडाखा title=

जयपूर : वादळ आणि पावसामुळे लग्न सभागृहाची भिंत कोसळल्याने 24 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात घडली आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

या अपघातात सुमारे 30 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  मृतकांमध्ये 8 महीला आणि 5 लहान मुलांचाही समावेश आहे.  

 
सेवर रोडवरील अन्नपूर्णम लग्न सभागृहात बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक वादळासह झालेल्या मुसळाधार पावसामुळे भिंत कोसळ्याचं सांगितले जात आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे लग्नात आलेल्या पाहुण्यांनी त्या भिंतीचा आसरा घेतला मात्र, तुफान वाऱ्यामुळे भिंत कोसळली आणि अनेक जण भिंतीखाली दबले गेलेत. 

अचानक झालेल्या या घटनेमुळे लग्न सभागृहात गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरी झाल्यामुळेही काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे.