'मोदींचा टॅटू असल्यामुळे लष्करात घेतलं नाही'

मोदींचा टॅटू छातीवर असल्यामुळे मला लष्करामध्ये घेतलं नसल्याचा आरोप मध्यप्रदेशच्या भोपाळमधल्या टिकमगडच्या तरुणानं केला आहे.

Updated: Aug 26, 2016, 06:45 PM IST
'मोदींचा टॅटू असल्यामुळे लष्करात घेतलं नाही' title=

भोपाळ : मोदींचा टॅटू छातीवर असल्यामुळे मला लष्करामध्ये घेतलं नसल्याचा आरोप मध्यप्रदेशच्या भोपाळमधल्या टिकमगडच्या तरुणानं केला आहे. या 23 वर्षांच्या तरुणाच्या छातीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचा टॅटू आहे. 

सौरभ बिलगयान असं या तरुणाचं नाव आहे. जब तक सूरज चांद रहेगा शिवराज मामा और मोदी का नाम रहेगा असं या तरुणाच्या छातीवर गोंदवण्यात आलं आहे. 

दहावी पास असलेल्या या तरुणानं टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली आहे. एकदा नाही तर पाच वेळा मी लष्कराच्या भरती प्रक्रियेत सहभागी झालो, पण माझे प्रयत्न अयशस्वी ठरले. 

2014 मध्ये पुण्यातल्या खर्डीत, अनूपूर आणि गुनाच्या आर्मी कॅम्पमध्ये मी भरतीसाठी गेलो. यावेळी 16 किमी धावलो, पण जेव्हा छाती मोजायची वेळ आली तेव्हा माझ्या छातीवर असलेल्या टॅटूमुळे माझी निवड झाली नसल्याचं सौरभचं म्हणणं आहे. 

या मुद्द्यावरून मुख्यमंत्री, आमदारांना भेटण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचा दावाही या तरुणानं केला आहे.