दयेसाठी याकूबचा सुप्रीम कोर्टाकडे पुन्हा एकदा धावा

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला दोषी याकूब अब्दुल रजाक मेमन यानं आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाकडे याचिका करत द्येची भीक मागितलीय. 

Updated: Jul 23, 2015, 05:32 PM IST
दयेसाठी याकूबचा सुप्रीम कोर्टाकडे पुन्हा एकदा धावा  title=

नवी दिल्ली : 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला दोषी याकूब अब्दुल रजाक मेमन यानं आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाकडे याचिका करत द्येची भीक मागितलीय. 

या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली जाणारा याकूब हा एकमेव दोषी आहे. 30 जुलै रोजी याकूबला फासावर लटकावण्यात येणार आहे. या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी याकूबनं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाकडे दया याचिका दाखल केलीय. अजून सगळेच कायदेशीर मार्ग बंद झालेले नाहीत आणि आपण महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे दया याचिका पाठवली असल्याचं मेनननं आपल्या दया याचिकेत म्हटलंय. 

गेल्या मंगळवारी सुप्रीम कोर्टानं याकूबच्या भावानं दाखल केलेली दया याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर आता स्वत: याकूब दया याचिका दाखल करणार असल्याचं, त्याच्या वकिलांनी म्हटलं होतं. यानंतर याकूबनं लगेचच महाराष्ट्राच्या राज्यपालांकडेही दया याचिका पाठवली होती. याकूबचे वकील अनिल गेडाम यांनी याकूबनं केंद्रीय तुरुंगात अधिकाऱ्यांकडे आपली दया याचिका सोपवली असल्याचं सांगितलं होतं. 

दुसरीकडे मुंबई पोलीस याकूब मेमनला फासावर लटकावण्यासाठी विशेष सुरक्षेच्या तयारीत आहेत. 53 वर्षीय मेमनला 30 जुलै रोजी नागपूर सेंट्रल जेलमध्य़े फाशी दिली जाणार आहे. त्यानंतर त्याचं मृत शरीर त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं जाईल. त्यानंतर मध्य मुंबईच्या माहिम स्थित त्याच्या घरी आणलं जाईल. एका पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, मुंबईतच त्याचा दफनविधी पार पाडला जाऊ शकतो. त्यामुळे, विमानतळ, त्याचं घर आणि कब्रगाह मैदानापर्यंत पोलिसांची सुरक्षा राहील. तसंच सावधानता म्हणून काही संवेदनशील भागांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.