नवी दिल्ली : झारखंडच्या देवघरमध्ये हावडा-अमृतसर एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं आर्मीच्या जवानांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केलाय.
चालत्या ट्रेनमध्ये सेनेच्या जवानांनी जबरदस्तीनं आपल्याला दारु पाजून त्यानंतर आपल्यावर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप या तरुणीनं केलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी हावडा - अमृतसर एक्सप्रेसमधून प्रवास करत होती. हावडामध्ये ती ट्रेनमध्ये सेनेच्या बोगीत चढली. ती आपल्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी लुधियानाला जात होती. रस्त्यात तिला दारु पिण्यासाठी भाग पाडण्यात आलं... आणि कथित स्वरुपात तिच्यावर सेनेच्या तीन जवानांनी सामूहिक बलात्कार केला.
ट्रेन मधुपूर स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. या प्रकरणात सेनेच्या एका जवानाला ताब्यात घेण्यात आलंय. तर इतर दोघे जण फरार आहेत.
तरुणीला मेडिकल टेस्टसाठी मधुपूरच्या एका हॉस्पीटलमध्ये पाठवण्यात आलंय. ही मुलगी अवघ्या १४ वर्षांची आहे. मधुपूर स्टेशनवर मुलीनं दिलेल्या माहितीच्या आधारे तक्रार दाखल करण्यात आलीय.