बंगळुरू: स्वच्छतागृह साफ करण्यास नकार दिला म्हणून बंगळुरूतील सरकारी सुधारगृहात १३ वर्षीय मुलाला अमानुष मारहाण केल्याची घटना पुढे आलीय. सुधारगृहातील रमेश यांनी मुलाला अमानुष मारहाण केली.
रमेशने मुलाला लोखंडाच्या पाईपनं मारलं. कारण त्यानं सांगितल्यानंतरही मुलानं बाथरूम स्वच्छ नव्हतं केलं. रस्त्यावर फिरणाऱ्या या मुलाला सामाजिक कार्यकर्त्यानं सरकारी सुधारगृहात पोहोचवलं. मात्र इथं येताच्या त्याच्यावर अत्याचार सुरू झाले.
इतर मुलांसारखं रांगेत उभा असतांनाही त्याला खूप मारलं. मात्र या अत्याचारानं परिसिमा आता गाठली जेव्हा रमेशनं मुलाला इतकं मारलं की, त्याच्या शरीरावर काळे-निळे डाग पडलेत.
मुलाचे वडील घर सोडून निघून गेलेले आहेत. तर आईची नोकरी सुटलीय. त्यामुळं हा मुलगा बंगळुरूतल्या रस्त्यावर फिरतांना दिसला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.