भारत-पाक सामना क्रिकेट चाहत्यांचा उत्साह

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचेस दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमीच नाही तर जगभरातील क्रिकेट चाहते वाट पाहत असतात. भारत-पाकमधील लढती या नेहमीच फुल ऑफ अॅक्श पॅक्ड होत असतात. या मुकाबल्याच्या वेळी वातावारणीही काही वेगळेच असते. दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांचा उत्साह यावेळी पाहण्यासारखा असतो.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 25, 2012, 06:00 PM IST

www.24taas.com, मुंबई
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचेस दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमीच नाही तर जगभरातील क्रिकेट चाहते वाट पाहत असतात. भारत-पाकमधील लढती या नेहमीच फुल ऑफ अॅक्श पॅक्ड होत असतात. या मुकाबल्याच्या वेळी वातावारणीही काही वेगळेच असते. दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांचा उत्साह यावेळी पाहण्यासारखा असतो.
भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही देशांच्या क्रिकेट लढती म्हटलं तर खुन्नस हा एकच शब्द डोळ्यासमोर येते. क्रिकेटच्या मैदानावर तर एक अनोखी लढाई रंगताना पाहायला मिळतेच शिवाय दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींमध्येही एक अनोखा समाना पाहयला मिळतो. दोन्ही देशाचे पाठीराखे आपली टीम जिंकावी यासाठी आपपल्यापरीने आपल्या टीमला चीअर करत असतात.
दोन्ही टीम्सचा एकच उद्देश असतो आणि तो म्हणचे फक्त मॅच जिंकण्याचा. इतर कोणत्याही टीमबरोबर झालेला पराभव या पाठिराख्यांना मान्य असतो. मात्र, भारत पाकिस्तानकडून अथवा पाकिस्तान भारताकडून पराभूत झाल्याचं दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींना चालत नाही. त्यामुळे चाहत्यांचा मोठा दबाव क्रिकेटपटूंवर पाहायला मिळतो. त्यामुळे या लढतींना मदर ऑफ ऑल क्रिकेटींग बॅटल म्हणलं जातं.
त्यातच पाच वर्षांनी पाकची टीम भारतामध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे या सीरिजला एक वेगळच वलय प्राप्त झालं आहे. आता क्रिकेटप्रेमींचा तो जोश आणि तोच उत्साह पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.