पुरुषांकडून या ५ गोष्टी करुन घेण्यासाठी उत्सूक असतात महिला

अनेक अशा गोष्टी असतात ज्या महिला पुरुषांना नाही सांगू शकत 

Updated: Apr 19, 2016, 05:01 PM IST
पुरुषांकडून या ५ गोष्टी करुन घेण्यासाठी उत्सूक असतात महिला title=

नवी दिल्ली : अनेक अशा गोष्टी असतात ज्या महिला पुरुषांना सांगू शकत नाही किंवा सांगताना त्या थोड्या घाबरतात. पण त्यांच्या मनात अशा काही गोष्टी असतात ज्या त्यांना त्यांच्या पतीकडून करुन घ्यायच्या असतात.

महिला या गोष्टी हव्या असतात :

१. काळजी घेणे : महिलांची अशी मनापासून इच्छा असते की त्यांच्या पतीने त्यांची अधिक काळजी घ्यावी. महिलांना अधिक काळजी करणारे पुरुष आवडतात. कारण ते अधिक संवेदनशील असतात.

२. कौतूक करणं : कौतूक ऐकणं हे महिलांना खूप आवडतं. प्रत्येक महिलेला वाटतं की त्यांच्या पतीने त्यांचं कौतूक करावं. जसं की त्यांचा ड्रेस, लूक, काम यांचं कौतूक करणे.

३. जवळ घेणं : आपल्या पार्टनरने आपल्याला जवळ घेणं. त्यांना हग करणं महिलांना आवडतं. आपल्या पतीने आपल्याला जवळ घेऊन रोमँटीक व्हावं असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. लग्नानंतर ही पतीने बॉयफ्रेंडप्रमाणे रोमँटीक असावं असं महिलांना वाटतं. 

४. चुका समजावून सांगणे : महिलांना वाटतं की पतीने फक्त आपल्याला खूश ठेवण्यासाठी खोटं कौतूक करु नये तर जिथे चुका होत असतील तर तेही सांगाव्यात. प्रेमाने चुका सांगणारे पती महिलांना आवडतात. 

५. भावना समजून घेणं : प्रत्येक महिलांना असं वाटतं की आपल्या पतीने आपल्या भावना समजून घ्याव्यात. शारीरिक संबंधादरम्यान ही त्यांनी कोणतीही जबरदस्ती करु नये. इंटीमेट दरम्यान पतीने त्यांना मुलाप्रमाणे प्रेम करावं आणि त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्यात.