मुंबई: केळीचे अनेक फायदे आहेत. केळ्यात खूप प्रमाणात पोटॅशियम आणि सोडियम असतं. जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतं. केळ सर्वांसाठी फायदेशीर आहे. डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम, किडनीच्या समस्या आणि कँसर पीडितांसाठी केळी उपयुक्त ठरतात.
Stethnewsमधील एका बातमीनुसार केळीचे फायदे बघून यूलिया माराबाथ या तरुणीनं काहीही न खाता १२ दिवस नुसती केळी खाल्ली. यूलियाला आपली बॉडी डिटॉक्सीफाय करण्यासोबतच अतिरिक्त वजन कमी करायचं होतं.
त्यामुळं तिनं एक प्रयोग करायचं ठरवलं. यूलियानं दिवसभर फक्त केळी खायचं ठरवलं. केवळ फलाहार करणं खरं तर हा चांगला डाएट नाही, कारण यामुळं शरीराला सर्व प्रकारचे न्यूट्रिशन मिळत नाहीत. मात्र यूलियानं स्वत: केळी खाऊन डाएट करायचं ठरवलं.
यूलिया स्वत: एक न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मोटीव्हेशनल कोच म्हणून ती काम करते. यूलिया आणि तिचा नवरा पॉल दोघांनी मिळून हा प्रयोग केला. केळ्यात इतर फळांच्या तुलनेनं अधिक कॅलरी असते. तसंच ते फायबर आणि ग्लूकोज युक्त असतात.
हे डाएट सुरू केल्यानंतर यूलियाला जाणवलं की, तिची पचनक्रिया पहिले पेक्षा अधिक चांगली झाली. सोबतच अधिक काळापासून असलेली पोटदुखी बंद झाली. यूलियानं स्वत:ला पहिलेपेक्षा अधिक रिलॅक्स जाणवलं. तसंच तिला कोणताही शारीरिक त्रास झाला नाही. ती तिच्या कामावर अधिक फोकस करू शकली आणि पहिल्याहून अधिक क्रिएटिव्ह झाली.
या प्रयोगामुळे पहिले तर यूलियाच्या आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर झाल्या. जशा हायब्लड प्रेशर आणि हार्मोन्सचं असंतुलनचा त्रास होता. मात्र या प्रयोगानंतर यूलियाचा सर्व त्रास दूर झाला. एवढंच नव्हे तर आतापर्यंत अनेक वर्षांपासून यूलियाला दिवस जात नव्हते. पण या प्रयोगानंतर ती प्रेग्नेंट झालीय.
यूलिया म्हणते या प्रयोगामुळं केवळ तिचं वजनच कमी झालं नाही तर अनेक हेल्थ बेनिफिट्सही मिळालेत. पण अशाप्रकारचं डाएट सुरू करण्यापूर्वी स्वत:ला पूर्णपणे तयार करणं आवश्यक असतं. हा प्रयोग प्रत्येकालाच सूट होईल असं नाही. जर आपणही हे डाएट करू इच्छित असाल तर पहिले आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.