एका आठवड्यात वाढलेलं वजन कमी करा

एका आठवड्यातही तुमचं वजन घटू शकतं, सुरूवातीला आपण वजन घटवण्यासाठी अनेक उपाय करत असतो, साधे उपाय म्हणजे आहारात तेलाचं प्रमाण कमी करणं, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे, जेवणाची वेळ पाळणे, झोपण्याच्या चार तास आधी खाणे, जास्त पाणी पिणं, फळ खाणं, सकाळचा व्यायाम वाढवणं. 

Updated: Dec 23, 2015, 01:06 PM IST
एका आठवड्यात वाढलेलं वजन कमी करा title=

मुंबई : एका आठवड्यातही तुमचं वजन घटू शकतं, सुरूवातीला आपण वजन घटवण्यासाठी अनेक उपाय करत असतो, साधे उपाय म्हणजे आहारात तेलाचं प्रमाण कमी करणं, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे, जेवणाची वेळ पाळणे, झोपण्याच्या चार तास आधी खाणे, जास्त पाणी पिणं, फळ खाणं, सकाळचा व्यायाम वाढवणं. 

मात्र काही दिवसानंतरही आपल्याला असं वाटतं की, आपलं वजन काहीही करता कमी होत नाहीय, पण तसं नसतं. जशी वजन वाढण्याची क्रिया सुरूवातीला मंद असते, तशीच वजन कमी होण्याची, मात्र यात सातत्य असलं पाहिजे, मग पाहा तुमचं वजन कसं नियंत्रणात येतं.

सर्वात पहिल्यांदा आहारात बदल करा
बेक केलेले पदार्थ सात दिवस खाऊ नका, गोड पदार्थही टाळा, म्हणजेच केक, कुकिंज, कपकेक्स, ब्रेड टाळा. यानंतर स्नॅक फूड चिप्स टाळा, दिवसभरातून एक तरी ताजं फळ खा, थोडसं काही खावंस वाटलं तर थोडासा कच्चा भाजीपाला खा, जसे कोथींबीर, मेथीची भाजी, कोबी.

तळलेले पदार्थ
काही तळलेल्या पदार्थांमध्ये जास्त कॅलरीज आणि मीठ असते, म्हणून फ्राय केलेल मासे, अंडी आणि मटण खाणं टाळा. यात बटाट्याच्या चिप्स, बटरलावून ब्रेड खाणे टाळा.

जास्त कॅलरीचे पदार्थ
हाय कॅलरी ड्रिंक्स, गोड पदार्थांमध्ये कॅलरीज जास्त असतात, हा महिन्यात आठवड्यात पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा आणि अल्कोहोल घेऊच नका, बिअरमध्ये सर्वात जास्त फॅटस असतात. फळांचा रस पिणं कधीही चांगलं. यात तुमच्या शरीरात उर्जा वाढणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात काय करता येईल
तुमची हालचाल वाढवा, फॅट्स बर्न करणारे व्यायाम करा, सुरूवातीला हळूहळू करा. लिफ्टचा वापर टाळून पायऱ्यांनी उतरा, चालण्याचा वेग हळूहळू वाढवा, आणि नियमित ठेवा. तुमच्या शरीरातील उर्जा खर्च झाली पाहिजे याचा विचार करा, नाहीतर याचं रूपांतर फॅटसमध्ये होतं आणि वजन वाढतं.

नेहमीच वॉशिंगमशीनमध्ये कपडे धुण्याची सवय असेल, आणि सुटीचा दिवस असेल तर हाताने कपडे धुवून पाहा, खूप सारी उर्जा खर्च होईल, सुरूवातीला थकायला होईल, पण नेहमीची सवय केल्यास स्फूर्ती येईल. या प्रकारे उर्जा खर्च करणारे छोटी-छोटी कामं करा. ऑफिसमध्ये बसून कामं असतील तर आपली कामं लवकर संपवा, आणि अधून मधून थोडंस उभं राहा, फिरा.