हिवाळ्यात त्वचेची काळजीसाठी सहा फटाफट टिप्स...

थंडी सुरु झालीय... मस्त गार वारा आणि मस्त गुलाबी थंडीची मजा घेण्यात बरेच जण व्यस्त आहे. मफलर, स्वेटर आणि स्कार्फ बाहेर निघालेत. पण, या दिवसांत काळजी घेतली तरी तुम्हाला थोडा फार हिवाळ्यातल्या आजारांचा त्रास होण्याची शक्यता असते...  

Updated: Dec 23, 2015, 08:58 AM IST
हिवाळ्यात त्वचेची काळजीसाठी सहा फटाफट टिप्स... title=

मुंबई : थंडी सुरु झालीय... मस्त गार वारा आणि मस्त गुलाबी थंडीची मजा घेण्यात बरेच जण व्यस्त आहे. मफलर, स्वेटर आणि स्कार्फ बाहेर निघालेत. पण, या दिवसांत काळजी घेतली तरी तुम्हाला थोडा फार हिवाळ्यातल्या आजारांचा त्रास होण्याची शक्यता असते...  

थंडीत भूक जास्त लागते. काजू, बदाम, अंजीर, आक्रोड, खारीक, खोबरे, गूळ, बेदाणे इत्यादी पदार्थांचं सेवन आपल्या प्रकृतीनुसार वाढवावं. हिवाळ्यात डिंक, सुकामेवा, बेसन, मेथी इत्यादींचे साजूक तुपात तळलेले लाडू शरिराला बलवर्धक ठरतात. याशिवाय थंडीत त्वचेच्या आणखीही काही तक्रारी उद्भवतात... पाहुयात या तक्रारींवर घरगुती उपाय कसे कराल. 

त्वचेची काळजी

- घराबाहेर पडताना चांगले विंटरकेअर लोशन वापरावे. विंटरकेअर लोशन आयुर्वेदिक असेल तर उत्तमच. 

- आंघोळीनंतर घरगुती उपाय म्हणून खोबरेल तेल, तिळाचे तेल, साय, लोणी तसेच तुपाचाही वापर क्रीमऐवजी करावा.

- हिवाळ्यात त्वचा स्निग्ध आणि कांतीमय ठेवण्यासाठी मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे. 

- पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर लावल्यास चेहरा सतेज दिसतो. 

- त्याचप्रमाणे संत्र्याचा रस, संत्र्याची साल, काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा काळवंडलेपणा कमी होतो. 

- रात्री झोपताना साय किंवा तूप घेऊन त्यात चंदन टाकून मालिश केल्यानेही त्वचेला तेज मिळतं.