अक्रोडपासून होणारे हे फायदे जाणून घ्या

अक्रोड आवडणारे या भीतीमुळे अक्रोड खात नाही की अक्रोडमध्ये कॅलरी जास्त असतात. त्यामुळे त्यांचे वजन वाढेल. परंतु एका नव्या संशोधनानुसार असे समोर आले आहे, की अमेरिकेतील सरकारने अक्रोडमध्ये जेवढ्या कॅलरी सांगितलेल्या त्या पेक्षा २१ टक्के कमी कॅलरी असल्याचे समजले आहे.

Updated: Dec 3, 2015, 06:18 PM IST
अक्रोडपासून होणारे हे फायदे जाणून घ्या title=

वाशिंग्टन : अक्रोड आवडणारे या भीतीमुळे अक्रोड खात नाही की अक्रोडमध्ये कॅलरी जास्त असतात. त्यामुळे त्यांचे वजन वाढेल. परंतु एका नव्या संशोधनानुसार असे समोर आले आहे, की अमेरिकेतील सरकारने अक्रोडमध्ये जेवढ्या कॅलरी सांगितलेल्या त्या पेक्षा २१ टक्के कमी कॅलरी असल्याचे समजले आहे.

जनरल ऑफ न्यूट्रीशिनने प्रकाशित केलेल्या अध्ययनात असे सांगितले आहे. अमेरिकेतील कृषि विभाग (यूएसडीए)ने अक्रोडमध्ये जेवढ्या कॅलरिज असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात त्यापेक्षा २१ टक्के कमी कॅलरी असतात.

डॉ. डेविड जे बेयर यांनी केलेल्या संशोधनानुसार एका अक्रोडमध्ये १४६ कॅलरी असतात, १८५ नाही.

बेयर यांच्यानूसार आम्ही केलेल्या संशोधनानुसार अॅक्रोड रोज खाल्याने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच असा चुकीचा समज होता की अक्रोडमध्ये जास्त कॅलरी असतात. काही खाण्याआधी त्या पदार्थात किती कॅलरी आहे हे बघून खाल्ले जातात. त्यामुळेच आता अक्रोड खाणाऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही.  

एतिहासिक पद्धतीनुसार अॅक्रोडमध्ये कॅलरी मोजण्यासाठी 'एटवॉटर' या पद्धतीचा वापर १९ व्या शतकापासून करण्यात येत होता. परंतु आता ही पद्धत जुनी झाली आहे, त्यामुळे बेयर यांनी नव्या पद्धतीनूसार संशोधन केले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.