नवी दिल्ली : आपल्या आवडत्या हिरोप्रमाणे आपली बॉडी असावी असे प्रत्येक मुलाला वाटते. मात्र त्यासाठी काही टिप्स पाळणं गरजेचं असते. परफेक्ट बॉडी बनवण्यासाठी खालील सोप्या टिप्स नक्की पाळा
आईस्क्रीम : लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आईस्क्रीम आवडते. मात्र जर तुम्हाला तुमच्या फेव्हरिट हिरोप्रमाणे बनायचे असेल तर आईस्क्रीम खाणे टाळावे लागेल
चॉकलेट : परफेक्ट बॉडी बनवण्यासाठी तुम्हाला चॉकलेट खाणे सोडून द्यावे लागेल. त्यासोबतच केकही
पिझ्झा : हल्ली फास्टफूडमध्ये प्रामुख्याने पिझ्झाचा समावेश केला जातो. यात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे पिझ्झा खाणे बंद करावे लागेल. तसेच बर्गरही.
कुकीज : कुकीज खाणे कोणाला आवडत नाही. मात्र योग्य बॉडीसाठी कुकीज खाणे चांगले नव्हे.यातही कॅलरीजची मात्रा अधिक असते.
ड्रिंक्स : कोणत्याही प्रकारच्या ड्रिंक्समध्ये कॅलरीज असतात. त्यामुळे जर तुम्ही परफेक्ट बॉडी बनवत आहात तर ड्रिंक्सना दूर ठेवा
फ्रेंच फ्राईज : हल्लीच्या तरुणांमध्ये हा लोकप्रिय खाद्यपदार्थ. मात्र तुम्हाला माहित आहे का बटाटामुळे लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे लठ्ठपणा दूर ठेवण्यासाठी फ्रेंच फ्राईज खाणे टाळावे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.