मुंबई: जाहिरातीत दिसणारे चमकदार दात प्रत्येकालाच आकर्षित करतात. असे चमकदार दात मिळवण्यासाठी अनेक लोक कित्येक पैसे खर्च करतात. पण घरगुती उपाय करूनही असे चमकदार दात आपल्याला मिळू शकतात. तसंच श्वासांच्या ताजेपणासाठी सुद्धा काही उपाय आपल्या घरातच मिळतात.
एक नजर टाकूयात अशाच पाच घरगुती उपायांवर...
1- जेवल्यावर किंवा काहीही खाल्यानंतर चूळ भरण्याची सवय नक्की घालून घ्या. यामुळं दातात अडकलेले अन्नकण निघून जाण्यास मदत होते आणि दात साफ राहतात. तसंच तोंड उघडल्यावर येणारा अन्नाचा वासही चूळ भरल्यानंतर निघून जातो.
2- खूप लोकांना ऑफिसमध्ये काम करताना सतत चहा, कॉफी पिण्याची सवय असते. पण याच चहा कॉफीमुळं दातांची चमक कमी होते. तसंच त्यावर काळपट थर जमू लागतो. त्यामुळे चहा, कॉफीची प्रमाण कमी करा आणि आपल्या दातांची मूळ चमक तशीच ठेवा.
3- दातांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी फायबरयुक्त फळं तसंच गाजर खाणं फारच उपयुक्त ठरतं. यामुळं फक्त दातच तंदुरूस्त रहात नाहीत तर हिरड्याही मजबूत बनतात.
4- ताज्या श्वासासाठी लंवंग, वेलची किंवा बडिशोप खाणं फायदेशीर ठरतं. यामुळं श्वासाला येणारा दुर्गंध निघून जातो.
5- तोंडाच्या सफाईसाठी पाणी हा एक महत्वपूर्ण घटक आहे. पाणी तोंडात धरून त्यानं जोरजोरात चूळ भरली तर ते माऊथवॉशसारखे कार्य करतं आणि विषाणूंना तोंडाबाहेर फेकायला मदत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.