आता तुमचे केस कधीच गळणार नाही

केस गळणे ही सर्वसामान्य समस्या आहे. केवळ महिला वर्गातच नव्हे पुरुषांनाही ही समस्या भेडसावते. केसगळती थांबवण्यासाठी अनेकाविध उपचार केले जातात. हे उपचार कितपत लागू पडतात ही वेगळी गोष्ट आहे. अनेकदा बाह्यउपचार केसगळती थांबवण्यावर परिणामकारक ठरत नाहीत. त्यासाठी अंतर्गत उपचाराची आवश्यकता असते. आपण काय खातो, पौष्टिक आहे की नाही याचाही परिणाम अनेकदा आपल्या केसांवर होत असतो.

Updated: Nov 21, 2015, 11:40 AM IST
आता तुमचे केस कधीच गळणार नाही title=

नवी दिल्ली : केस गळणे ही सर्वसामान्य समस्या आहे. केवळ महिला वर्गातच नव्हे पुरुषांनाही ही समस्या भेडसावते. केसगळती थांबवण्यासाठी अनेकाविध उपचार केले जातात. हे उपचार कितपत लागू पडतात ही वेगळी गोष्ट आहे. अनेकदा बाह्यउपचार केसगळती थांबवण्यावर परिणामकारक ठरत नाहीत. त्यासाठी अंतर्गत उपचाराची आवश्यकता असते. आपण काय खातो, पौष्टिक आहे की नाही याचाही परिणाम अनेकदा आपल्या केसांवर होत असतो.

केसांच्या आरोग्यासाठी हेल्थी जेवण महत्त्वाचे

केस प्रोटीनपासून बनलेले असतात. त्यामुळे आपल्या जेवणामध्ये अधिक प्रोटीनचा समावेश करणे आवश्यक आहे. हिरव्या भाज्या, फळे, दूध आणि मांस, मच्छी यांच्यात प्रोटीनची मात्रा अधिक असते. शरीरात लोहाची कमतरताही केसगळतीचे कारण असू शकते. यासाठी लोहयुक्त पदार्थही जेवणात असले पाहिजेत. केस वाढवण्यासाठी व्हिटॅमीन ‘ई’ फायदेशीर आहे. त्यामुळे व्हिटॅमीन ‘ई’युक्त पदार्थ खाणे फायद्याचे ठरते. काजू, बदाम, दूधही केसांच्या उत्तम वाढीसाठी उपयोगी ठरते. याशिवाय दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे.

केसगळती थांबवण्यासाठी हा रामबाण उपाय

तीन ते चार चमचे बेल पावडर रात्रभर थंड पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्यात 10 ते 15 ग्रॅम गूळ घाला. या पाण्याला सुती कपड्यातून गाळून घ्या. या मिश्रणाला केसांच्या मुळाशी लावून 15 मिनिटांसाठी मसाज करा. दोन ते तीन महिन्यांत तुमचे केस गळणे बंद होईल. जेव्हा केस गळणे कमी होईल तेव्हा केसांना तेल लावा. याने फायदा होईल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.