सर्वेत उघड झाले अनेक सिक्रेट जे महिला-पुरूष ठेवतात लपवून

 प्रत्येकाच्या जीवनात काही सिक्रेट असतात. ही सिक्रेट ते आपल्या जीवनसाथीसोबत शेअर करत नाही, किंवा आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करत नाहीत. अशी काही सिक्रेट ते आपल्या मनात कमीत कमी १५ वर्षांपर्यंत ठेवतात. 

Updated: Jul 16, 2015, 08:51 PM IST
सर्वेत उघड झाले अनेक सिक्रेट जे महिला-पुरूष ठेवतात लपवून title=

नवी दिल्ली :  प्रत्येकाच्या जीवनात काही सिक्रेट असतात. ही सिक्रेट ते आपल्या जीवनसाथीसोबत शेअर करत नाही, किंवा आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करत नाहीत. अशी काही सिक्रेट ते आपल्या मनात कमीत कमी १५ वर्षांपर्यंत ठेवतात. 

हे आम्ही नाही म्हणत एका ताज्या सर्वेमध्ये ही गोष्ट समोर आली आहे. जगातील ५ पैकी ३ व्यक्ती आपल्या जीवनातील काही गुपीत काय लपवून ठेवतात. सर्वेनुसार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक गोष्ट असते ती आपल्या मनात कमीत कमी १५ वर्ष लपवून ठेवतो. 

हे सिक्रेट कोणते आहे याला सीमा नाही. पण आम्ही तुम्हांला असे काही सिक्रेट सांगणार आहोत त्यांचा उल्लेख या सर्वेमध्ये करण्यात आला आहे. आपल्या जीवनसाथीशी असे सिक्रेट लपवून ठेवतात जे जीवनसाथीला माहीत झाले असते तर त्यांनी संबंध तोडले असते. आईशी सिक्रेट लपवून ठेवण्याची गोष्टही सामन्य आहे. टॅटू काढला, परिक्षेत मार्क कमी पडले अशा गोष्टी आईपासून लपविल्या जातात. 

लग्नापूर्वीचे अफेअर 

लग्नापूर्वीचे अफेअर असेल तर लग्नानंतर शेवटच्या श्वासापर्यंत तो किंवा ती लपवून ठेवण्याचे प्रमाण अधिक आहे. 

लग्नानंतरच अफेअर 
सर्वेनुसार अशा व्यक्तींची संख्या कमी नाही की जे लग्नानंतरचे आपले अफेअर कोणाला सांगत नाही. 

लग्नाशिवाय झालेलं मूल 
बहुतांशी व्यक्ती लग्नापूर्वी झालेल्या बाळाबद्दल कुटुंबातील व्यक्तीला सांगत नाही किंवा कोणत्याही जवळच्या व्यक्तीला सांगत नाही. 

लहानपणी केलेली चोरी 
लहानपणी एखाद्या दुकानातून गुपचूप चोरी केल्याचं कोणी सांगत नाही. 

दारू पिऊन गाडी चालवताना पकडल्याचे
भूतकाळात दारू पिऊन गाडी चालविल्यावर पकडल्यावरही कोणी सांगत नाही. 

इंटरनेटवर अश्लील चॅट 
कोणी इंटरनेटवर अश्लिल चॅट केलं असेल तर ते असे सिक्रेट लवकरच कोणाला सांगत नाही. 

कोणाविषयी यौन इच्छा 
एखाद्या व्यक्ती विषयी यौन इच्छा जागृत होत असेल  तर ती कोणाशी शेअर करत नाही. 

अफेक्शन 
लग्नानंतर पुरूषाचे महिलेप्रति आणि महिलेचे पुरूषाप्रती असले अफेक्शन लोक सहसा सांगत नाहीत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.