सौंदर्यासाठी खास टिप्स: आपली त्वचा करा सुंदर आणि हेल्दी!

प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. कुणाच्या डोळ्याखाली काळे वर्तुळ, कुणाच्या केसांमध्ये कोंडा अनेक अनेक त्रास असतात. याच काही समस्यांवर घरगुती उपाय करून आपण मात करू शकतो. 

Updated: Jun 16, 2015, 12:48 PM IST
सौंदर्यासाठी खास टिप्स: आपली त्वचा करा सुंदर आणि हेल्दी! title=

मुंबई: प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. कुणाच्या डोळ्याखाली काळे वर्तुळ, कुणाच्या केसांमध्ये कोंडा अनेक अनेक त्रास असतात. याच काही समस्यांवर घरगुती उपाय करून आपण मात करू शकतो. 

जाणून घ्या खास टिप्स: 

- रोज झोपण्यापूर्वी आपले डोळे गुलाबपाण्यानं स्वच्छ केल्यास ते स्वच्छ आणि चमकदार होतील.

- उन्हाळ्यात मुरुम किंवा पुरळ आल्यास बर्फ किंवा गार्नियरचं क्रीम लावल्यास लगेच आराम मिळतो.

- त्वचा कोरडी असेल तर दह्यात टोमॅटोचा रस मिसळून ती पेस्ट लावावी. नक्की फायदा होतो.

- दही आणि दूध समान प्रमाणात मिसळून शरीरावर लावण्यानं त्वचा मुलायम आणि मऊ होते.

- केसांमध्ये होणारा कोंडा दूर करण्यासाठी दह्यात अंडे फेटून केसांना लावावं.

- चेहर्‍यावर फळांचा किंवा भाज्यांचा रस लावल्यानं त्वचेला अधिकाधिक तजेला मिळतो.

- चमेलीच्या फुलांच्या पाकळ्यांना पाण्यात उकळून ठेवून द्यावं. दिवसातून ३ ते ४ वेळा गुळण्या केल्यानं उष्णतेनं येणारं तोंड बरं होतं.

- लिंबाच्या रसानं डोक्याची मालिश केल्यानं केसांचं पिकणं आणि गळणं कमी होतं. लिंबाच्या रसात सुकलेल्या आवळ्याचं चूर्ण मिसळून केसांना लावल्यानं केस काळे होतात. केसांच्या इतर तक्रारींवरही उपाय होतो.

- डोळ्यांभोवती क्रीम लावताना ते डोळ्यात जाणार नाही, याची काळजी घ्यावी. क्रीमचा वापर साधारणपणे रात्री झोपताना करावा.

- डोळ्याखालची काळी वर्तुळं घालविण्यासाठी चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवावी. सकाळी धुऊन टाकावे. यामुळं डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळं नाहीशी होतील.

- सावळेपणा दूर करण्यासाठी एक बादली पाण्यात एका लिंबाचा रस टाकावा. या पाण्यानं स्नान करण्यानं त्वचेची बंद रंध्रे खुलतात आणि त्वचा उजळते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.